मृदा संवर्धन काळाची गरज – श्री.रविशंकर चलवदे.
मृदा संवर्धन काळाची गरज – श्री.रविशंकर चलवदे.
कृषी निविष्ठा विक्रेत्यां नी केवळ कृषी निविष्ठा विक्रेता
म्हणून न राहता कृषी व्यवसाय व्यवस्थापक म्हणून शेतकऱ्यांना सर्व माहिती व
सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात म्हणून कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे
मॅनेज हैदराबाद पुरस्कृत कृषी निविष्ठा विक्रेत्यां करिता कृषी पदविका
अभ्यासक्रम चालू केला असून या अभ्यासक्रमास 40 कृषी सेवा केंद्रचालकांनी
प्रवेश घेतला आहे दर रविवारी या अभ्यासक्रमाचे वर्ग घेण्यात येत असून आज 5
डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने विशेष प्रशिक्षण वर्गाचे
आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी श्री.रविशंकर चलवदे यांनी प्रशिक्षणार्थ्यांसोबत
संवाद साधला यावेळी जमिनीचे आरोग्य या विषयावर प्रा.व्यंकट शिंदे यांनी
मार्गदर्शन केले तसेच माती तपासणी करिता मातीचा नमुना कशा रीतीने घेतला
जातो याचे प्रात्यक्षिकही या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षक प्रा.तुकाराम मंत्रे
यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्याकडून करुन घेतले.
याशिवाय सध्याची शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना व
कृषी विक्रेत्यांना माहिती देता यावी म्हणून हरभरा पिकातील विविध किडी व
रोगांचे व्यवस्थापन या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे
सहाय्यक प्राध्यापक डॉ.प्रशांत सोनटक्के व डाॅ.ज्ञानदेव मुटकुळे यांचे ही
मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते यासोबतच डॉ.कृष्णा अंभोरे यांनी ज्वारी
व मका पिकातील अमेरिकन लष्करी अळीच्या नियंञणासाठी एकात्मिक व्यवस्थापन
पद्धतीवर सादरीकरण केले. #soil #health #WorldSoilDay #worldsoilday2021



#DAESI #program #kvk #sagroli #nanded #farmers #farm #agriculture

Comments
Post a Comment