Posts

Showing posts from March, 2022

रेशीम उद्योग हा सर्वात फायदेशीर शेती पूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाद्वारे याचे तंत्रज्ञान आत्मसात करून घ्यावे – रेशीम उपसंचालक श्री दिलीप हाके यांचे प्रतिपादन.

Image
रेशीम उद्योग हा सर्वात फायदेशीर शेती पूरक व्यवसाय असून शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाद्वारे याचे तंत्रज्ञान आत्मसात करून घ्यावे – रेशीम उपसंचालक श्री दिलीप हाके यांचे प्रतिपादन... वातावरण बदला मुळे शेतीवर होणारे अनिष्ट परिणाम लक्षात घेऊन शेतीपूरक व्यवसायास चालना मिळावी म्हणून संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्रातील उत्कर्ष लर्निंग सेंटर येथे राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या सहकार्याने रेशीम उद्योगाच्या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणास आज सुरुवात झाली. प्रशिक्षणाचे उद्घाटन औरंगाबाद विभागाचे रेशीम उद्योग उपसंचालक श्री.दिलीप हाके यांनी केले असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ.चंद्रकांत लटपटे यांनी प्रशिक्षणार्थ्याना,तुती लागवड व व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन केले. दुपारच्या सञात जालना जिल्हा रेशीम अधिकारी श्री अजय मोहिते यांनी रोपवाटिका लागवड व व्यवस्थापन विषयी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले .या प्रशिक्षणा दरम्यान सुजलेगाव ता. नायगाव येथील तरुण शेतकरी श्री संदीप कदम यांनी रेशीम उद्...

शेती व्यवसायाला पशुपालन सारख्या जोडधंद्याची सोबत लाभली तर शेतकऱ्याची निश्चितच प्रगती होण्यास मदत होते.

Image
शेती व्यवसायाला पशुपालन सारख्या जोडधंद्याची सोबत लाभली तर शेतकऱ्याची निश्चितच प्रगती होण्यास मदत होते... याच अनुषंगाने संस्कृती संवर्धन मंडळ संचालित, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे “व्यवसायिक कुकुटपालन” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 18 ते 20 डिसेंबर 2021 दरम्यान घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये कुक्कुटपालन व्यवसायातील उद्दीष्टे आणि संधी, व्यवसायिक कुक्कुटपालनाची विविध प्रकार, शेडची बांधणी, शेडचे व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, घरगुती खाद्य तयार करण्याची प्रक्रिया, कुक्कुट पक्ष्यांच्या विविध अवस्थेतील व्यवस्थापन, लसीकरण, जैविक संरक्षण आणि रोग निवारण व व्यवस्थापन आणि व्यवसायातील विविध संधी अशा विविध विषयांवरती प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिका द्वारे मार्गदर्शन करून प्रशिक्षणार्थींना स्वतः अनुभव घेण्याची संधी देण्यात आली. या तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये शेतकरी सहलीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींना वसमत येथील आधुनिक कुक्कुटपालनाच्या शेडला भेट देऊन तिथल्या एकंदर होणाऱ्या व्यवस्थापनाबद्दल माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणासाठी एकूण 40 प्रशिक्षण...

मृदा संवर्धन काळाची गरज – श्री.रविशंकर चलवदे.

Image
 मृदा संवर्धन काळाची गरज – श्री.रविशंकर चलवदे. कृषी निविष्ठा विक्रेत्यां नी केवळ कृषी निविष्ठा विक्रेता म्हणून न राहता कृषी व्यवसाय व्यवस्थापक म्हणून शेतकऱ्यांना सर्व माहिती व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात म्हणून कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे मॅनेज हैदराबाद पुरस्कृत कृषी निविष्ठा विक्रेत्यां करिता कृषी पदविका अभ्यासक्रम चालू केला असून या अभ्यासक्रमास 40 कृषी सेवा केंद्रचालकांनी प्रवेश घेतला आहे दर रविवारी या अभ्यासक्रमाचे वर्ग घेण्यात येत असून आज 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.रविशंकर चलवदे यांनी प्रशिक्षणार्थ्यांसोबत संवाद साधला यावेळी जमिनीचे आरोग्य या विषयावर प्रा.व्यंकट शिंदे यांनी मार्गदर्शन केले तसेच माती तपासणी करिता मातीचा नमुना कशा रीतीने घेतला जातो याचे प्रात्यक्षिकही या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षक प्रा.तुकाराम मंत्रे यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्याकडून करुन घेतले. याशिवाय सध्याची शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना व कृषी वि...

जमिनीचे आरोग्य व माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, रब्बी पीक संरक्षण, उन्हाळी हंगामात सोयाबीन बीजोत्पादनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Image
जमिनीचे आरोग्य व माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, रब्बी पीक संरक्षण, उन्हाळी हंगामात सोयाबीन बीजोत्पादनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन.. जागतिक मृदा दिनानिमित्य दि.5 डिसेंबर रोजी संस्कृती संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी व तालुका कृषी अधिकारी कार्यालय बिलोली यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी शेतकरी मेळावा व जमीन आरोग्य पत्रिका वितरण समारंभ मौजे कराळ तालुका बिलोली येथे ठेवण्यात आला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य व माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन, रब्बी पीक संरक्षण, उन्हाळी हंगामात सोयाबीन बीजोत्पादन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विविध कृषी विभागाच्या योजना इत्यादी विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे चे शास्त्रज्ञ प्रा. कपिल इंगळे ,डॉ. कृष्णा अंभोरे, आत्मा बिलोली चे तालुका तंत्र व्यवस्थापक श्री कांबळे व समूह सहाय्यक श्री मधुकर चिंगळे श्री दिवडे ,शेतीशाळा प्रशिक्षक माधव शेळके, शिवशंकर कनशेटे, इत्यादींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात 20 शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. #...

शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा – डॉ. डी. बी. देवसरकर

Image
  शेतकऱ्यांनी   एकात्मिक   शेती पद्धतीचा अवलंब करावा   –   डॉ.   डी. बी. देवसरकर शेतकऱ्यांनी बिजोत्पादन कार्यक्रम हाती घेऊन पिक उत्पादन वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने शेती करून स्वयंपूर्ण झाले पाहिजे तसेच शेती आणि शेती आधारित उद्योगाची कास धरली तरच शेतकरी टिकून राहील असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापिठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ डी बी देवसरकर यांनी केले.  २ डिसेम्बर २०२१ रोजी संस्कृती संवर्धन मंडळ संचालित कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद नांदेडचे जिल्हा विकास अधिकारी  डॉ. टी. जी. चिमणशेटे  यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय नांदेड कार्यालयाचे अधिकारी डॉ. काशिनाथ बडीहवेली  यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय सुरु करण्यासाठी पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेबाबत विस्तृत माहिती दिली. जिल्हा...